१. इथे सर्वांग सुंदर रस्ते आहेत. ९९% रस्त्यांवर अजिबात खड्डे नाहीत. पडले तरी ताबडतोब, तिसर्या दिवशी दुरुस्ती होते.
२. टाउनप्लानिंग, रस्त्यांची रचना आणि रुंदी चांगली असल्याने ट्रॅफिकची
समस्या नाही. शहरातल्या कोणत्याही टोकापासून दुसर्या टोकाला जायचे असेल तर
असंख्य मार्ग उपलब्ध आहेत. कुठूनही कुठे पोचायचे असेल तर केवळ पंधरा मिनिटे पुरेशी. अगदी गल्लीबोळातले रस्तेही तीन गाड्या जातील इतके रुंद आहेत.
३. कनेक्टीवीटी. नाशिकवरुन मुंबईला लवकरात लवकर पोचू शकणे ही सुरुवातीला
माझी गरज होती. रेल्वेने ठाणे अडीच तास, दादर तीन तास. रस्त्यानेही जेमतेम
तेवढेच. आता तर अजून वेगवान होईल. मी स्वतः असा खुप प्रवास २०१३ ते २०१५
ह्या दोन वर्षात केला. आरामात जाणे-येणे होते. एसी चेअर कारचे बुकींग केले
तर टेबलवर व्यवस्थित लॅपटॉप ठेवून जाता येतांनाचा सगळा वेळ शांतपणे काम करत
घालवता येतो. हे पाच तास काम करुन वसूल केले आहेत. कारनेही बरेचदा
जाणे-येणे झाले. मला माझ्या वेळेनुसार मुंबईत पोचणे शक्य होते. आता
पुणे-नाशिक हायवे झाल्याने तोही वेळ साडेतीन चार तासावर येईल.
४.
नाशिकमध्ये अतिशय उत्तम प्रतिचा ताजा आणि चांगला भाजीपाला, अन्नधान्य
मुंबईपेक्षा कमी किंमतीत मिळत. मुंबईत दारावर आलेल्या/सोसायटीच्या आसपास
विकणार्यांकडे आलेल्या व तोवर निकृष्ट झालेल्या भाज्यांशिवाय पर्याय नाही.
आम्ही दोन्हीकडे अनुभव घेतलाय तेव्हा फरक सोन्या-पितळ्याइतका आहे. तसेच
धान्य. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ हे उत्तम व दर्जेदार होलसेल मार्केटमधून
घेता येत असल्याने सोयीचे. मुंबइत मिळणार्या धान्यांत भेसळ असते व किंमत
खूप जास्त. जेव्हा मी इथे आलो तेव्हा आंबेमोहोर तांदूळ मुंबईपेक्षा वीस
रुपयांनी स्वस्त व दर्जेदार मिळायचा. (आता आम्ही इंद्रायणी घेतो, the best
and regional crop)
५. कॉस्ट ऑफ लिविंग तर कैच्या कै कमी आहे. चार
जणांचे कुटूंब (स्वतःचे घर) असेल तर वीस हजार रुपयांत सर्व गरजा पुरवून
उत्तमोत्तम आयुष्य जगू शकते. बाकी जसा ज्याला खर्च करायचा असेल तो. मी
ठाण्यात ५४० फुटाच्या १बीएचके फ्लॅटचे १० हजार देत होतो. इथे अवघ्या सहा
हजारात फोरव्हिलर पार्किंग्+छोटीशी बाग, दोन टेरेस, दोन बेडरुम, मोठा हॉल,
मोठी किचन वगैरे असलेलं इन्डिपेन्डन्ट रो हाउस भाड्याने मिळालं, तेही
पाहिजे तितके वर्ष राहा, मुंबईसारखं दर अकरा महिन्याने बदला घर असे नाही.
६. सार्वजनिक स्वच्छता. घंटागाड्यांचे तंत्र नाशिकमध्ये नीट राबवले जाते.
कचरा आणि अस्वच्छता मला तरी दिसली नाही. आमच्या भागात काही कारणामुळे
झालेला कचरा असेल तर थेट नगरसेवकाला फोन लावून तो घेऊन जाण्याची सूचना करु
शकतो. ते ताबडतोब २४ तासांत कारवाई करतात. भटकी कुत्र्यांची तक्रार केल्यास
दोन दिवसात गाडी येऊन मिळतील तेवढी कुत्री घेऊन जातात.
७. इथे
उत्तम इंटरनेट कनेक्टीवीटी आहे. बर्याच आयटी कंपन्या असल्याने विदेशात
त्यांचा व्यापार चालतोच. पण मीही इथे नाशिकमध्ये बसून दुबईतल्या रिअलइस्टेट
प्रदर्शनांचे जाहिरातींचे काम सांभाळले आहे. मुंबई, दुबई, इंग्लंड इत्यादी
ठिकाणी असलेल्या माझ्या क्लायंटशी स्काइपवरुन आरामात संवाद साधता येतो.
८. सगळ्यात बेस्ट. वातावरण. जगण्यास उत्साहवर्धक वाटेल असे अतिशय सुंदर
वातावरण. तीनही ऋतू व्यवस्थित वेगवेगळे अनुभवता येतात. उन्हे फार तापत
नाही. पाऊस फार होत नाही. थंडीही सहन होईल इतकी. पोटाला दोन घास जातात आणि
अंगाला लागतातही. मुंबैतला चिकट घामाचा त्रास समूळ संपला. प्रत्येक कॉलनीत
मुलांना खेळायला मोठ्या बागा आहेत, मैदाने खेळणी आहेत, जॉगिंग ट्रॅक आहेत,
व्यायामाची साधने आहेत (तीच जी आदुठाकरे मरिनड्राइववर लावायची लय बोंबाबोंब
करत होते, ती इथे त्यांच्याही आधी लावून तयार आहेत.)
९. खरेदी.
सर्व प्रकारच्या वस्तू नाशिकमध्ये मिळतात. मुंबईत जे मिळू शकतं ते इथेही
मिळतं. सगळे प्रसिद्ध ब्रॅण्डचे शोरुम नाशकात आहेत. सर्व प्रकारच्या
मनोरंजनाची साधनेही आहेत.
१०. पर्यटन. निसर्गाच्या सानिध्यात
असल्याने सगळीकडे कायम हिरवळ, झाडे दिसत राहतात.बाहेर जायचे असले तरी
नाशिकच्या पन्नास किमी परिसरातच खुप पर्यटनस्थळे आहेत. चहूबाजुने चार
प्रकारचे हवामान, भौगोलिक परिस्थिती अनुभवता येते.
माझेही अधूनमधून नाशिकला जाणे होत असते. आईच्या अस्थिविसर्जनासाठी रामकुंडाला गेलो होतो. अत्यंत गलिच्छ भाग आहे तो. पवित्र असे काहीच वाटत नाही तिथे ! बाकी सर्व मुद्दे पटले !
उत्तर द्याहटवा