तुमचा पगार कमी असल्याने तुम्ही घर, गाडी,
फ्रीज, टीव्ही आणि वाशिंगमशिनसुद्धा मासिक हफ्त्यावर घेता. तुमचा पगार कमी
असल्याने आजारपणाच्या खर्चासाठी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेता. तुमचा पगार
कमी असल्याने तुम्ही जास्त बचत करु शकत नाही म्हणून तुम्ही अचानक गचकल्यास
कुटूंबाची फरफट नको म्हणून लाइफ इंशुरन्स घेता. तुमचा पगार कमी असल्याने
तुम्ही बर्याच हौसामौजा पुर्या करु शकत नाही. तुमचा पगार
कमी असण्याचे कारण तुम्ही अधिक चांगले शिक्षण घेऊ शकला नाहीत असे तुम्हाला
वाटत असते. म्हणून तुम्ही तुमचा पगार मुलांच्या अधिक चांगल्या शिक्षणासाठी
खर्च करता.
--------------
व्यवसायवृद्धी-संचलनासाठी घेतले जाणारे कर्ज आणि वैयक्तिक जीवनातल्या भौतिक सुखसुविधा पुरवण्यासाठी घेतली जाणारे कर्जे ह्यात मूलभूत फरक असतो. तुमच्या कर्जाच्या पैशाचा उपयोग जर अधिक पैसे कमावण्यासाठी होत नसेल तर त्या कर्जावरचे व्याज ही तुमच्या श्रमांची चोरी आहे.
कदाचित कोणाला पटणार नाही पण व्यवसाय-कर्जे सोडता इतर सर्व कर्जे ही गरिबांचे शोषण असतात. उदाहरणार्थ, राहण्यासाठी घर घ्यायला कर्ज घेण्यास भाग पाडण्यासारखी परिस्थिती निर्माण केली जाते, त्यातून कर्जदाराचे आयुष्यभर शोषण करण्याची आधुनिक व्यवस्था जन्माला येते. कर्ज घेणारा कर्ज देणार्याचा गुलाम होऊन जातो. आभासी आनंदात जगतो पण आयुष्यभर कर्जदात्याला श्रीमंत करण्यासाठी श्रम करतो.
-------------------
तुमचा पगार कमी आहे ह्यात तुम्हाला तुमचीच स्वतःचीच चूक वाटत असते. तुमच्या पगार कमी असण्यात तुमचे शिक्षण, तुमची बुद्धीमत्ता, तुमची मेहनत, तुमचे सामाजिक स्थान ह्याचा काहीतरी फार मोठा रोल आहे असे तुम्हाला वाटत असते.
तुमचा पगार किती असावा हे तुम्ही स्वतः ठरवू शकता का? तुमचा पगार नक्की कोण ठरवते? तुमच्या कामाची लायकी आणि किंमत कोण ठरवते?
--------------------
ऑटोमोबाईल फॅक्टरीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान टाळणारी एखादी कल्पना शोधणार्या प्रामाणिक हुशार कामगाराची एक प्रोत्साहन प्रमाणपत्र देऊन बोळवण केल्या जाते, मात्र त्याच कल्पनेमुळे कंपनीचा नफा वाढतो आणि कंपनीच्या शेअर्समध्ये लाखो रुपये गुंतवणार्या शेअर होल्डरास कोट्यावधीचा परतावा प्राप्त होतो. ह्या सगळ्या घटनाक्रमात काही चुकीचे घडते आहे असे कोणाला वाटत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा