इंग्रजी ज्ञानभाषा वगैरे ठाम समज करुन घेतलेल्या आणि मराठीला ते शक्यच नाही असे समजणार्यांसाठी माझा एक अनुभव.
डिजाइन थिंकिंग ह्या विषयावर मी मराठीतून लिहिले आहे. डिजाइन थिंकिंग ही
मूळ संकल्पना आणि त्यावरचे काम हे मुख्यत्वे परदेशात इंग्रजी भाषेत झालेले
आहे. उपयोजित कला सोडल्या तर इतर क्षेत्रांमधून ह्या पद्धतीचा वापर मोठ्या
प्रमाणात सुरु व्हायला फार नाही चार पाच वर्षेच झाली आहेत. भारतातही ही
संकल्पना तशी नवीच आहे. त्यामुळे त्याबद्दलचे सगळे संदर्भ हे इंग्रजीतून उपलब्ध आहेत. म्हणजेच हे ज्ञान इंग्रजीतूनच उपलब्ध आहे.
आता बघा, गेल्या पंधरा दिवसात मी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ह्या
संकल्पनेवर आधारित तीन कार्यशाळा घेतल्यात. ह्या संपूर्ण मराठीतून होत्या.
मुळात ही संकल्पना माहितच नाही, त्यात ती इंग्रजीतून सांगितली तरी समजणार
नाही. मग आपल्या नेहमीच्या भाषेत हे ज्ञान वाटले. समजून घेतांना कोणालाही
काही अडचण आलेली नाही. तेव्हा संकल्पना आणि ज्ञान-माहिती हे कोण्या भाषेचे
मांडलिक नसतात. समजून घेता येत नसेल किंवा समजावून सांगता येत नसेल तर
त्याचे कारण वेगळे असते.
इतर भाषांतले ज्ञान आपल्या भाषेत आणून ते
वाटायची तळमळ हवी असते. आणि आपल्या भाषेत आणणे म्हणजे शब्दार्थ, अनुवाद
करणे नव्हे. मॅग्नेटिक ला चुंबकिय, अॅटम ला अणू म्हणायचं का असे
खिल्लीबाजी करणारे लोक असतील तर त्यांना ज्ञान म्हणजे काय हे तरी कितपत
कळते ह्याची शंका आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा