तन्मयशी, म्हणजे माझ्या मुलाशी, मी
अनेक विषयांवर चर्चा करताना, अनेक गोष्टी सांगत असतो. त्यातली मिलो आणि
हरितक्रांती ही गोष्ट मी अनेकवेळा जाणूनबुजून सांगत असतो. मी मिलोची लाल
भाकरी कधी खाल्ली नाही, माझ्या वडीलधार्यांकडूनच ऐकले. एकदा नव्हे, दोनदा
नव्हे, तर सातत्याने ऐकले. नंतर बर्याच वर्षांनी हरितक्रांती आणि त्याचा
इतिहास अभ्यासला तेव्हा त्यांचे हे नेहमी-नेहमी सांगणे किती महत्त्वाचे होते ते जाणवले. तेच मी माझ्याही मुलांना सांगत राहणे आवश्यक आहे असे मला वाटते.
मी तन्मयला सांगतो, लहानपणी धान्य दळायला काढल्यावर काही चुकार दाणे इकडे-तिकडे पडले तरी आई एकूण-एक दाणा वेचून उचलून घ्यायची. मलाही तसेच करायला लावत असे. एकसुद्धा दाणा जमीनीवर सोडून देता कामा नये अशी मला सक्त ताकिद असायची. मग नंतर कधीतरी 'मिलोची लाल भाकरी खायला लागली' असे वडिलांकडून ऐकले जायचे. तेव्हा मिलो म्हणजे काय, का खायला लागली हे समजत नसले तरी त्यांच्या आविर्भावावरुन असे वाटायचे की हा काहीतरी वाईट अनुभव असावा, जो नाईलाजाने त्यांच्या वाट्याला आला.
मग मिलो म्हणजे काय ते त्याला सांगतो. अमेरिकेने कसे निकृष्ट दर्जाचे धान्य भारतीयांना भिखारी समजून उपकार दाखवल्यासारखे पाठवले होते हे सांगतो. जनावरेही खाणार नाहीत अशा धान्यावर आपल्या खंडप्राय देशातल्या जनतेला अवलंबून राहावे लागत होते. त्या काळात खिशात पैसे असले तरी दुकानात हवे ते आणि हवे तितके धान्य मिळेल अशी परिस्थिती नव्हती. ह्या अपमानास्पद अवस्थेतून बाहेर पडण्याचा आपण भारतीयांनी ठाम निश्चय केला. राज्यकर्त्यांपासून, शास्त्रज्ञांपासून ते शेतकरी आणि ह्यात गुंतलेल्या प्रत्येक भारतीयापर्यंत, सर्वांनी कंबर कसून भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवायचा निर्धार केला. मग सुरु झाली हरितक्रांती. हजारो-लाखो लोकांचे श्रम सार्थक झाले आणि आपण स्वयंपूर्ण झालो. भारतीय म्हणून अभिमान बाळगावा अशा अनेक गोष्टी आहेत, त्यात हरितक्रांती आणि दुग्धक्रांतीतून स्वयंपूर्ण झालेला भारत ही खूप प्रेरणादायी घटना आहे.
आज अन्नधान्याचा तुटवडा नाही, पण म्हणून आपण धान्य भरतांना, काढतांना जमीनीवर सांडणारे चुकार दाणे असेच सोडून द्यायला नको. एकूण एक दाणा उचलून घेतला पाहिजे. आपल्या ताटातला एकूण एक घास खाल्ला पाहिजे. उष्टे टाकायला लागेल इतके घेऊच नये, घेतले तर उष्टे टाकू नये. आपल्या ताटात असणार्या प्रत्येक घासाच्या मागे हजारो माणसांची मेहनत असते. शेतकर्यापासून ते बाजारातल्या हमालापर्यंत, अशा अनेक अनोळखी लोकांच्या अपरंपार कष्टामुळेच आपण आज सुखाने चार घास खाऊ शकतो.
जमीनीवर सांडलेला प्रत्येक दाणा उचलून घेणे आणि ताटात उष्टे न टाकणे ही आपण त्या सर्व ज्ञात-अज्ञात उपकारकर्त्या लोकांबद्दल व्यक्त करत असलेली कृतज्ञता समजली पाहिजे. बाकी काही करू शकत नसलो, तर निदान जाणीव तरी ठेवू शकतोच.

१९७२ सालातल्या दुष्काळानंतर रेशनवर मिलो मिळत होते. लाल रंगाची ज्वारी असायची ती. त्याची भाकरी किंचीत कडवट आणि कोरडी लागत असे. इतर धान्ये महाग व मिळण्यास कठीण होती. पण ते दिवस फार लवकर सरले. त्यापुर्वीही रेशनिंगचे दिवस होते. अगदी मुंबईतही खुल्या बाजारात तांदूळ मिळत नव्हता. रेशनवर अत्यंत वाईट दर्जाचा मिळत होता. आम्ही वसई किंवा ट्रॉम्बेहून आणत असू तांदूळ. पण तो लपवून आणावा लागत असे.
उत्तर द्याहटवा