एखाद्या एक लिटर शेती औषधाची बॉटल एक हजार रुपये किमतीची असते, तिच्यात जे
औषध असते ते उत्पादकाला तीस रुपये ते पन्नास रुपये ला मिळालेले असते. पण
त्यासोबत प्लास्टिक बॉटलचा, packaging चा, कामगारांचा, मार्केटिंगचा,
वाहतुकीचा, रिटेल विक्रेत्याच्या मार्जिन चा विचार केला तर दुकानात बॉटल
ठेवायला पाचशे रुपये खर्च येतो. त्यापुढे ती विकली गेली तर तिच्यावर शंभर
रुपये नफा उत्पादकाला मिळतो. अन्यथा माल परत घेऊन जावा लागतो.त्याचा खर्च वेगळा.
इतर औषधांशी स्पर्धा असल्याने रिटेल विक्रेत्याला MRP पेक्षा कमी विकावी लागते. त्यामुळे हजारची बॉटल प्रत्यक्षात ८०० ते ९०० ला विकली जाते. विक्रेत्याला त्यावर १००-२०० रुपये प्रत्यक्ष नफा मिळतो, पण त्यामागे त्यालाही खूप मेहनत आणि खर्च असतात. ह्या सर्व व्यवहारात प्रत्येक टप्प्यावर द्यावे लागणारे कर आणि लाचखोर अधिकाऱ्यांचे हफ्ते हेही मोजले पाहिजेत.
सगळा नफा volume sizeवर असतो. दर बॉटल मागे १०० रुपये मिळत असतील तर उत्पादक एखाद्या सीजन मध्ये एक लाख बॉटल विकतो, मग मर्सिडीज बीएमडब्लू मध्ये फिरायला सिद्ध होतो... पण तिथवर यायला त्याला खूप मेहनत लागते. १८-१८ तास काम करावे लागते, भयंकर फिरावे लागते, रिलेशन मेंटेन करायला लागतात, पैशाची कसरत सांभाळावी लागते. background ला काय होते ते सामान्य लोकांना दिसत नाही.
आता कोणी जर म्हणत असेल कि तीस रुपयात मिळणारे औषध शेतकऱ्याला हजार रुपयाला विकले जाते, शेतकऱ्याची पिळवणूक-शोषण केले जाते तर त्याला अधिक अभ्यासाची गरज आहे. तीस रुपयाला मिळणारे औषधसुद्धा कोण्यातरी टप्प्यावर फुकट उपलब्ध असते. शोषण होते असे ओरडणाऱ्या लोकांनी तो मूळ टप्पा ते शेतकरी हा प्रवास संपुष्टात आणावा आणि शोषणापासून मुक्ती द्यावी. पण एकाचे कष्ट आणि दुसरा करतो ते शोषण असे फरक करू नये.
डाव्या चळवळीनी एकूणच उद्योजक-भांडवलदार ह्यांच्याबद्दल एक निगेटिव वातावरण बनवून ठेवले आहे. ज्यात असे समजले जाते कि श्रीमंत लोक पिळवणूक करतात म्हणूनच श्रीमंत होऊ शकतात, शोषण-पिळवणूक करणे हे उलट्या काळजाच्या लोकांचे काम असते. त्यामुळे जो श्रीमंत तो अमानुष दरिंदा असल्यासारखे चित्र रंगवले जाते.
लोक श्रीमंत होतात कारण ते पिळवणूक करण्याची मानसिकतावाले असतात अशी विचारसरणी असली की श्रीमंतीमागचे कष्ट दुर्लक्षित करून श्रीमंतीचा मत्सर करायला सोपे जाते.
टीप: भ्रष्टाचार आणि भेसळ करून ग्राहकाची फसवणूक करणे हा स्वतंत्र विषय आहे. पण बरेच सामान्य लोक अशी फसवणूक करणे म्हणजेच व्यापार-उद्योग करणे असते अशी समजूत करून बसले आहेत. अशा लोकांना स्वत: एखादा बिझनेस करून बघायची शक्ती मिळू दे अशी प्रार्थना करतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा