शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

शाळा म्हणजे रोबोट कारखाना नव्हे.

भारतीय समाज विज्ञानवादी नसल्याचे खापर शालेय व्यवस्थेवर फोडले जाते. आणि त्याचे पाप कॉंग्रेसच्या माथी मारले जाते. पूर्वी मलाही हे पटायचे. भारतीय लोकांमध्ये काहीही अवगुण दिसले कि शिक्षणव्यवस्थेवर द्यायची जबाबदारी ढकलून कि झाले.... पण...

शाळा म्हणजे हवा तो रोबोट बाहेर काढणारा कारखाना नव्हे. भारतातल्या प्रत्येक समस्येसाठी शाळेला जबाबदार ठरवणे चूक आहे. हजारो वर्षांचा इतिहास करोडो लोकांच्या जाणीवानेणीवातून, पाच पंचवीस वर्षांत डिलीट मारल्यासारखा पुसला जाऊन हवे तसे नागरिक निर्माण झाले पाहिजेत हि अपेक्षा अत्यंत चुकीच्या गृहितकावर आधारित आहे. मुलांनी विज्ञानवादी होण्यासाठी शाळांची गरज नसते, विज्ञानवादी समाजाची गरज असते. विज्ञानवादी समाज शाळांमधून तयार होत नाही तर विज्ञानवादी समाजाला आणखी पुढे जायला शाळा फक्त मदत करतात. विज्ञानवादी असणे हे शाळेतून शिकायचे गुण नाहीत. तसेही जगातल्या कोणत्याही शैक्षणिक शाळेत मूल्ये शिकवली जात नसतात, पोटापाण्याला लागण्यापुरते शिक्षण मिळते. पण जे आयुष्यावर खरोखर परिणाम करतात, ज्याने मानस घडतो, ते संस्कार आणि विचार मुलांना घरातून, समाजातून, भोवतालातून प्राप्त होतात. भारतीय भोवताल धर्मकर्म, जातपात, कर्मकांड ह्यात अडकून पडलेला असताना त्याला एका झटक्यात बाहेर काढून युरोप अमेरिकेच्या तोडीस तोड बनवावे हि अपेक्षा गैर आहे.

इच्छुकांनी Epigenetics ही जीवशास्त्राची नवी शाखा अभ्यासावी. पुढे कधीतरी लिहिणार आहेच ह्यावर. भारतीय समाजाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे संशोधन आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा