आज जीवंत असलेल्या एका माणसाच्या जन्माला दोन व्यक्ती, एक स्त्री एक पुरुष,
त्या प्रत्येक पुरुष आणि स्त्रीला परत एक आई एक वडील, आणि त्या प्रत्येक
आई वडिलांना आपआपले स्वतंत्र आईवडील, अशी मांडणी करत गेलो तर एकट्या
तिसाव्या पिढीमध्येच 1,073,741,824 (एकशे सात कोटी सदतीस लाख एक्केचाळीस
हजार आठशे चोविस) माणसे एका व्यक्तीच्या जन्माला कारणीभूत असलेली दिसून
येतात. प्रत्येक पिढीतल्या आईबापांचा
हिशोब केला तर एकूण 'दोनशे चौदा कोटी माणसे' एका व्यक्तीच्या जन्मासाठी
कारणीभूत ठरली आहेत. हा आकडा अर्थात गणिती मांडणीनेच आलेला आहे.
प्रत्यक्षात हे संभव नाही.
सत्तर हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरची एकूण लोकसंख्या सुमारे पंधरा हजार होती असा अंदाज आहे.
एक हजार वर्षांपूर्वी, म्हणजे इसवी सन १००० च्या सुमारास भारताची लोकसंख्या सात कोटींच्या आसपास होती. अख्ख्या पृथ्वीवर तेव्हा चाळीस कोटींच्या आसपास माणसे होती. म्हणजेच जे काही झाले ते ह्या चाळीस कोटींच्या एकमेकांच्या संपर्कात येण्यापासूनच झाले आहे. गेल्या हजार वर्षांत तरी असेच आहे की लग्ने जातीत होत आली आहेत. त्याआधीचा इतिहास वेगळाही असेल पण त्याच्याशी आत्तातरी काही कर्तव्य नाही.
भारतात सुमारे ३ हजार जाती आहेत. ही सात कोटी लोकसंख्या ३ हजार जातींत विभागली तर प्रत्येकी सुमारे २३ हजार डोकी सापडतील. अर्थात हे गणिती आहे. प्रत्यक्षात प्रत्येक जातीची लोकसंख्या वेगवेगळी असू शकते. कोणाची दहा लाखसुद्धा असू शकते तर कोणाची पाचशे सहाशेही असू शकते.
अगदी टोकाची बाजू धरली तर दहा लाख लोकसंख्येतून जोड्या जुळवत जुळवत लग्ने झाली असतील. काही जातींत मामा-भाचीचेही लग्न होते. काहींकडे सख्ख्या बहिण-भावांच्या मुलामुलीचेही विवाह होतात. दूरच्या नात्यात तर लिंकेज बघितलेही जात नाही. अशाच प्रकारच्या अनेक प्रथा असल्या तरी जातीबाह्य जीन्स ह्या वर्तुळात शिरतील ह्याचीही शक्यता लक्षात घेतली पाहिजे.
अशा परिस्थितीत जर दोन्हीकडचे लाइनेज (प्रत्येकाचे आई-बाबा शोधणे) काढत गेले तर ह्या गोतावळ्यात अनेकांचे प्रवाह वेगवेगळ्या प्रवाहात परत परत मिसळून एकत्र येतांना दिसतील. म्हणजेच आपल्या जन्माची कथा अवघ्या काही हजार लोकांपासून सुरु झालेली असू शकते. कदाचित दहा हजार. कदाचित एक हजार. किंवा त्यापेक्षाही कमी.
फार जास्त लांब न जाता पाहीले तर आपल्या दोन्हीकडच्या फक्त चौथ्या पिढीचा विचार करता त्या पिढीतले टोटल १६ खापरपणजे-पणज्या आपल्या जन्मास कारण आहेत. अगदी शंभर वर्षांआधी ते जगत होते. ह्या सोळा वेगवेगळ्या लोकांचे जीन्स तर नक्की आपल्या शरीरात आहेतच. त्यांचे शारीरिक गुणधर्म, स्वभाववैशिष्ट्ये आपल्यात कुठे न कुठे असतातच.
-------------
६५ हजार वर्षांपूर्वी गुहेतल्या भिंतीवर चित्र काढणारा आदिमानव तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या डीएनएत आहे. दहा हजार वर्षांपूर्वी भाताची पेरणी सुरु करणार्या, जंगली गुरांना पाळायला तयार करणार्या, मासे पकडायला जाळे टाकणार्या तीस चाळीस लाखांमधल्या अनेकांचे जीन्स आपण घेऊन आहोत. पाच हजार वर्षांपूर्वी शेतीच्या जमीनी जिंकण्यासाठी व त्यांच्या रक्षणासाठी एकमेकांची डोकी फोडणार्या माणसांचे स्वभाव आपल्या धमन्यांतून वाहत आहेत. काहीही असले तरी आपण सगळे खरोखरच एकमेकांशी रक्ताच्या नात्याने घट्ट जोडलेले आहोत.
--------------
जरी असे लाखो वर्षांचे डीएनए आपण सांभाळत आलो असलो तरी काहीतरी आहे जे आपल्याला सातत्याने बदलत असते, आपल्या पुढच्या पिढ्यांवर प्रभाव टाकत असते. अनुवांशिकता.
त्याबद्दल पुढच्या भागात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा