इंटरनेटवर सध्या ड्रॉपशिपिंग हा एक
प्रकार फार ट्रेंडिंग आहे. ड्रॉपशिपिंग म्हणजे एखाद्या प्रॉडक्टला आपल्या
वेबसाईटवर डिस्प्ले करणे, जमेल तितक्या प्रकारे, जमेल तितक्या चॅनेलमधून
त्याची जाहिरात करणे, आणि जेव्हा एखादा ग्राहक ती विकत घेतो तेव्हा ती थेट
त्या प्रॉडक्टच्या उत्पादकाकडून ग्राहकाला कुरिअर केली जाते. त्यावर
विक्रेत्याला काही टक्के कमिशन मिळते.
ह्यात जो ड्रॉपशिपिंग करतोय त्याला स्वतः:कडे वस्तू साठवण आणि कुरिअर
वगैरेचा काही त्रास नसतो. एकप्रकारचे हे इंटरनेटवरचे दुकान आहे जिथे
होलसेलकडून माल ऑर्डर करून ग्राहकाला पोचवला जातो. एकूणच बिनपैशाचा चांगली
कमाई देणारा धंदा म्हणून ह्याची लोकप्रियता वाढत चालली आहे. बरेच लोक लाखो
रुपये महिन्याला कमवत आहेत अशा कहाण्या इंटरनेटवर पसरल्या आहेत.
दिसायला हा प्रकार सोपा सुटसुटीत आणि आकर्षक वाटत असला तरी तितका नाही. त्याच्या तांत्रिक घोळात जाण्यापेक्षा मी काही वेगळ्या गोष्टींकडे बघतो.
सगळे ड्रॉपशिपर्स आणि भलामणकर्ते चिनी मालाची विक्री करावी असे सूचित करतात. अलीएक्स्प्रेस ह्या चिनी वेबसाईटवरून थेट तुमच्या वेबसाईटवर ती प्रॉडक्ट्स कनेक्ट होतात. म्हणजे चिनी कंपन्यांचे सामान विकण्यासाठी ड्रॉपशिपरचा वापर केला जात आहे. त्यांना भरमसाठ कमिशन देऊन सक्सेसस्टोरी बनवल्या जात आहेत. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी ह्या प्रकारात उतरावे आणि इंटरनेटवरचे मार्केट चिनी वस्तुंनी भरून टाकावे. ह्यात काही नवीन जगावेगळे घडते आहे असे काहीही नाही. पण ड्रॉपशिपरचे मरण होणार आहे. कोणीही कोणतीही वस्तू विकू शकत असल्याने विक्रेत्यांची स्पर्धा वाढणार, स्पर्धेला तोंड द्यायला ते किमतीचे युद्ध खेळणार त्यांचे कमिशन कमीकमी होत जाणार, पण सर्व वस्तूंचा उत्पादक चीन आहे, विक्रेत्यांचे काहीही झाले तरी फायदा मात्र त्यालाच होणार. ग्राहकाने वस्तू विकत घेतल्यानंतर विक्रेत्याचा पुढील घडामोडींवर कोणताही ताबा राहत नाही. प्रॉडक्ट ग्राहकाला पोचले कि नाही, ते जसे सांगितले तसेच आहे कि नाही, काही समस्या आल्या, किंवा ग्राहकाने रिटर्न केले तर ड्रॉपशिपरला ग्राहक जबाबदार धरतो, अलीएक्स्प्रेसला नाही.ड्रॉपशिपर चिनीमाल विकत असल्याने स्वतःचा ब्रँड विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे सस्टेनेबिलिटी म्हणजे धंद्यातले सातत्य आणि वाढ याची खात्री नसते.
ज्यांना ह्या प्रकारच्या कामात रस असेल, त्यांनी जरूर उतरावे. परंतु हि एक मल्टीलेव्हलमार्केटिंग स्कीम आहे हे लक्षात असु द्यावे. म्हणजे सुरुवातीला येणाऱ्या उमेदवारांना भरमसाठ फायदा होतो, तो पाहून आणखी उमेदवार येतात, त्यांना मात्र तितका फायदा होत नाही. एखाद्या कंपनीने एकाच शहरात अनेकांना पेट्रोलपंपची डीलरशिप दिली तर कंपनीचा फायदा होतो, डीलर मात्र स्पर्धेमुळे तोट्यात राहतात. म्हणून फिजिकल जगात विशिष्ट क्षेत्रानुसार डीलरशिप दिली जाते. मात्र डिजिटल जगात असे काहीही नाही.
मात्र यावर उपाय आहे. लोकलाईज ड्रॉपशिपिंग हा एक उत्तम पर्याय आहे. इंटरनेटवरून कमाई करण्याची इच्छा असलेल्या इथे मात्र चांगले भविष्य आहे. इथे प्रॉडक्ट, सप्लायचेन आणि कस्टमरकेअर सर्व आपल्या हातात असल्याने पुरेसे नियंत्रण राहते. त्याचसोबत आपण आपल्या देशी उत्पादकांचे प्रॉडक्ट्स आपल्याच देशबांधवांना विकले तर आपल्याच देशाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेला फायदा होईल ना?
आजच्या डिजिटल जगात अमर्याद संधी प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. मात्र जो त्यावर अंमल करतो तोच यशस्वी होतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा