मोदींना पर्याय नाही असा प्रसार करणे हा एक प्रोपगंडा आहे. विरोधी पक्ष
२०१० पासूनच लकवाग्रस्त झालेले आहेत. त्यांची रिकवरी शक्यच नाही. मोदींना
परास्त करायचे असेल तर मोदींपेक्षा भारी प्रोपगंडा करणे आवश्यक. सध्या
जमाना मार्केटींगचाच आहे. मोदी मार्केटींग करुन जिंकले. मोदींना पर्याय
नाही हे सुद्धा मार्केटींगच आहे २०१९ साठी. मोदींच्या तोलामोलाचे अनेक नेते
भारतात आहेत. मोदींना कोणी 'अवतार' समजत असेल तर तो भाग वेगळा. मोदी
नव्हते तेव्हा भारताचे काही बिघडले नाही, आले म्हणून लगेच (किंवा पुढच्या
२० वर्षातही) फरक पडणार नाही.
देशाच्या विकासाबद्दल अवास्तव संकल्पना ठेवणारे मंदबुद्धी आहेत. २ -३ वर्षात विकास होत असतो काय असे आता उलटं विचारणारे भाजपे ४७ ला स्वतंत्र झाल्याबरोबर विकास मागत होते. इर्रीस्पेक्टीव ऑफ हू रुल्ड इन्डीया, मागच्या ७० वर्षात आपण एक एक पायरी चढत एवढा विशाल देश ज्या ठिकाणी घेऊन आलो ते अभिमानास्पद आहे. यात सर्वच पक्षांचे, जनतेचे, नेत्यांचे योगदान आहे. इथे नेहमी सिंगापूर, जापान वगैरे देशांचे दाखले दिले जातात, की अमूक वर्षात ते इतके पुढे गेले वगैरे. पण अनेक देशांमध्ये चाललेली गृहयुद्धे, गरिबी, भुखमरी, लढाया, अराजक हे कोणी बघत नाही. भारतीय नागरिकाचे असे आहे की स्वतः काही करायचे नाही, आपल्या कमतरतांसाठी दुसर्यांना दोष देत बसायचे. इतर देशांच्या विकासाचे दाखले देणार्यांनी स्वतःच्या गावात तरी विकास घडवून आणला का एवढे स्वतः बघावे. तुमच्या गावा-शहराएवढे देश विकसित झाले, त्याचे तुम्ही दाखले देता ना? त्यामागची कारणेही बघा. इथे मी कॉंग्रेस पक्षाला पाठीशी घालतोय असा काहींचा समज होईल. पण वास्तव तसे नाही. कॉण्ग्रेस असो वा भाजपही प्रत्येकाचे पाय मातीचे आहेत. कोणीही धुतल्या तांदळाचा नाही.
मोदींना ज्यासाठी निवडुन दिले, ती कामे होत आहेत काय? किती झाली, आता काय स्टेटस आहे, किती दूरगामी निर्णय घेतले, कोनती कामे सुरु आहेत ह्या सर्वांबद्दल तिसर्याच घटकाकडून प्रचार होणे आता आवश्यक आहे. काँग्रेस्+विरोधी कितीही ओरडले तरी त्यांची प्रतिमा भजपआयटीसेल्+विकलेला मिडिया यांनी अविश्वासार्ह्+मतलबी अशी करुन ठेवली आहे.
भारतात राजकिय पटलावर काय चालू आहे हेच जिथे विरोधी पक्षाला सुधरत नाहीये तिथे मोदीविरोधात कोणी उभा करावा हे कुठून सुधरेल. मोदींना परास्त करणे फक्त भाजपमधून शक्य आहे. भाजप ही जळकुट्या व असुरक्षित लोकांची संघटना असल्याने ते फार दिवस कोणाला डोक्यावर बसवून ठेवत नही. २०१९ ची निवडणूक भाजप जिंकेल, काही शंका नाही. कदाचित मोदीच पंतप्रधान असतील. भारत कसा असेल हे मात्र माहित नाही.
भाजप जिंको वा कोणीही. भारताच्या विकासाची कामे झाली पाहिजेत, विकासाच्या योजनांबद्दल बोलले पाहिजे, मोदी निवडून आल्यावर जो उत्साह दिसत होता तो आता दिसतोय काय? केवळ संघवाले, हिंदुत्ववाले उत्साही आणी माजलेले दिसत आहेत. त्यांच्या मनातला विखार दिवसेंदिवस बाहेर येत आहे. मेंढराची कातडी घसरुन लांडग्यांची दिसायला लागली आहे. तरी लोक समजणार नाहीत. कारण बहुसंख्य लोकांना असे असणे म्हणजेच रामराज्य आहे असे पटवण्यात आले आहे. मुस्लिमांचे फार लाड झाले आता हिंदुंचे राज्य आहे अशा प्रकारची भावना हिंदुंमध्ये आहे. धर्म आणि राष्ट्रवादाच्या गुंगीत खर्या विकासाकडे लक्ष जात नाही. जाऊ दिले जात नाही.