जाणीव
दृश्य १
वर्दळीचा रस्ता,
फार गजबज माजलेली, वाहने भरधाव, हळूहळू जसा रस्ता सुचेल तशी वाट काढत पळत होती,
अचानक मोठा आवाज झाला, गर्दी थांबली,
एक म्हातारे साठीतले गृहस्थ अचानक थांबावे लागल्याने स्कूटर वरून तोल जाऊन रस्त्यावर पडले,
इतर लोक बघत होते, एक दोघे पुढे आले, एकाने स्कूटर उचलली, दुसऱ्याने त्यांना हात देऊन उठवले,
आजोबांचे हाड मोडल्यासारखे जाणवत होते, तो मुलगा त्यांची विचारपूस करत होता,
"चल रे विजय, उशीर होतोय आपल्याला, इंटरव्यू आहे आणि काय बसलायस समाजसेवा करत", त्याचा मित्रा त्याच्या वर खेकसला,
"मोठ्या मुश्किलीने कुणीतरी सालं बोलावते आपल्याला, त्यातही उशीर झाला तर बोंबच",
विजय ने त्याच्या कडे मान वळवून बघितले आणि म्हणाला,"ठीक आहे रवी तू हो पुढे मी आलोच."
रवीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहत तिथून काढता पाय घेतला,
विजयने आजोबाना रस्त्याच्या कडेला घेतले,रिक्षात बसवले,"चला काका, मी तुम्हाला हॉस्पिटलला नेतो, तुमच्या घरच्यांना कळवूया."
हे सगळे बघत असलेली एका मर्सिडीज ची काच पुन्हा वर गेली, गर्दी पुन्हा आपल्या वाटेला लागली,
दृश्य २
एक सुसज्ज आणि श्रीमंत वाटणारा स्वागतकक्ष, रवी आपली फाईल घेऊन प्रवेश करतो,
"मी रवी साठे, मला इंटरव्यू साठी बोलावले आहे," रवीने तिथल्या रिसेप्शनिस्ट ला सांगितले.
"ठीक आहे बसा. हे भरा", तिने त्याच्या हाती एक कागद दिला.
तोच तिथे धापा टाकत विजय पोचला, तो घामाने डबडबला होता पण एक समाधान त्याच्या चेहऱ्यावरून ओथांबत होते,
"मी विजय मराठे, श्रीनिवास परांजपेना भेटायचे आहे, मला असीस्टंट म्यानेजर पदासाठी इंटरव्यूला बोलावले आहे," विजय तिला म्हणाला,
'ठीक आहे बसा, मी त्यांना कळवते', ती उत्तरली,
'मिस, इकडे वाशरूम कुठे आहे सांगाल काय?' विजय ने विचारले,
तीने उजव्या हाताने दिशा दाखवत सांगितले,"डावीकडून पुढे".
विजय लगबगीने जाऊन फ्रेश होऊन आला,
रवीने त्याला आश्चर्याने विचारले,"अरे तू वेळेवर कसा पोचलास? मला वाटले आता तू लटकला, उगाच पोलीस केस होईल आणि तुझा दिवस जाईल तिकडेच."
"सायबा, इच्छा असेल तर सगळे म्यानेज होते, एवढे म्यानेज नाही करता आले तर आपण म्यानेजर काय कामाचे."
"तिथून दोन मिनिटावर हॉस्पिटल होते, आणि आता न्यायालयाच्या आदेशानुसार कुणाही अपघात झालेल्या जखमी व्यक्तीला कुठल्याही जवळच्या हॉस्पिटलात पोलीस केस शिवाय दाखल करता येते, मी रिक्षात बसल्या बसल्या लगेच त्या आजोबांच्या मुलाला फोन लावला, आम्ही पोचेपर्यंत तो तिथे पोचला सुद्धा. मग काय मी सटकलो."
"मिस्टर मराठे, तुम्हाला बोलावलंय, श्रीराम यांना परांजपे साहेबांकडे घेऊन जा."
"चल येतो मी,"
"मी सर्वात आधी आलो तरी ह्याला कसे बोलावले माझ्या आधी?", रवी खुसफुसला,
रिसेप्शनिस्टने ते ऐकले आणि त्याला म्हणाली," त्यांनी आपले काम काय आहे आणि कुणासोबत आहे ते स्पष्ट सांगितले, तुमचा फॉर्म अजून भरून झाला नाही, मला कसे कळणार तुम्हाला कुणी बोलावलंय ते,"
"अहो मला सुद्धा परंजापेनीच बोलावलंय" असे म्हणून रवी पटापट फॉर्म लिहु लागला.
दृश्य ३
कॉन्फेरेंस रूम. आत चार आलिशान खुर्च्यावर चार अनुभवी आणि प्रगल्भ दिसणाऱ्या व्यक्ती बसल्या होत्या.
विजय त्यांना आपली प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे दाखवत होता.
चार जणांपैकी एकाने त्याला विचारले, "ते सर्व ठीक आहे, मिस्टर मराठे, या कागदपत्रांशिवाय तुमच्याकडे काय आहे जे आम्हाला उपयोगी पडेल."
"म्हणजे? मला समजले नाही सर."
"ह्या पदव्या ही प्रमाणपत्रे तुम्ही वाचून पाठ करून मिळवली आहेत, त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात काय उपयोग आहे? प्रत्यक्ष व्यवहारात वापरता येईल असे तुमच्याकडे काय आहे?"
"माफ करा सर मला, जरी मी ही प्रमाणपत्रे वाचून पाठ करून मिळवली असली तरी, ती प्रत्येक गोष्ट लिहिताना वाचताना माझ्या जाणीवा अजून प्रगल्भ करत गेली आहे. आणि प्रत्यक्ष व्यवहारात वापरता येईल असे म्हणाल तर माझ्याकडे माझा आत्मविश्वास आहे, धडाडी आणि चिकाटी आहे, माझ्यावर सोपवलेले प्रत्येक काम मी आव्हान समजून स्वीकारतो आणि जबाबदारी म्हणून पूर्ण करतो."
"धन्यवाद मिस्टर मराठे, तुम्ही रिसेप्शन मध्ये बसा."
"मिस्टर रविकांत विचारे, तुम्हाला बोलावलंय."
रवीची मुलाखत सुरु असते, खुर्चीत बसलेले चौघे त्याची कागदपत्रे नीट बघत असतात.
"मिस्टर विचारे, तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण काय आहे?", एकाने विचारले,
रवी गोंधळला, अचानक इंटरव्यू मध्ये असा कुणी प्रश्न विचारेल असे त्याला कुणी सांगितले नव्हते,
"जीवन जगण्यासाठी कठोर परिश्रमाची नितांत आवश्यकता आहे, आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्हाला सदैव तत्पर राहणे गरजेचे आहे, काही स्वप्ने पूर्ण करायला काही इच्छांना निरोप द्यावा लागतो."
"ठीक आहे, तुम्ही रिसेप्शन मध्ये बसा."
रवी उठतो.
ज्येष्ठ दिसणाऱ्या व्यक्तीकडे बाकीचे तिघे उत्तराच्या अपेक्षेने बघतात.
"मिस्टर रवीला रिटेलमध्ये एका स्टोरचा असिस्टंट म्यानेजर करा", ज्येष्ठ बोलले.
"आणि मिस्टर मराठेंना?" तिघांनी विचारले,
दीर्घ श्वास घेत ते उत्तरले,"त्यना कष्टमर केअर डिविजन चा सी ई ओ करा........"
"....................................................."
सगळे स्तब्ध आणि आश्चर्यदग्ध झाले,
त्या सर्वांचे चेहरे पाहून ज्येष्ठ बोलायला लागले,
"तुम्हाला असे वाटत असेल, कि मला कदाचित वेड लागले असावे. मिस्टर मराठेमध्ये मी असे काय पहिले कि फक्त एक दीड वर्षाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीला अत्युच्च पदावर बसवायला निघालोय?, मी जे बघितले ते तुम्हाला सांगतो"
त्यांनी त्यांच्या मर्सिडीजमधून सकाळी घडलेला प्रसंग बघितलेला, तो सांगितला.
"त्या मुलाच्या एवढाश्या परोपकाराने हुरळून जाऊन मी हा निर्णय घेतला असे जर तुम्हाला वाटत असेल, तर पुढे ऐका. त्याने त्या आजोबाना हॉस्पिटल मध्ये नेले असेल आणि इतर सोपस्कार केले असतील, पण तरीही तो मुलगा इंटरव्यू साठी अगदी वेळेत पोचला"
"अपघाताची परिस्थिती अचानकच उद्भवते, भलेभले भाम्भावून जातात. इथे तर समस्या त्याची नव्हतीच मुळी तरी त्याने दुसऱ्याच्या जीव आपला समजून मदत केली. आणि अशी काहीतरी व्यवस्था केली कि तो इथेपण वेळेत पोचला. म्हणजे त्याचा मेंदू आणि मन कठीण काळात किती भराभर आणि योग्य निर्णय घेत असलं पाहिजे?"
"याचे कारण त्याचा स्वतःवरचा विश्वास आणि कामाबद्दलची निष्ठा, हे सांभाळून तो अडचणीत सापडलेलेल्याना मदत ही करतो."
"आपल्या कंपनीच्या ग्राहकाभिमुखी प्रतिमेसाठी आणखी आपल्याला काय हवे?"
"पण सर, त्याला एवढ्या मोठ्या पदाचा आवाका पेलवेल का, त्याला तसा काहीच अनुभव नाही"
"मिस्टर परांजपे, काय काम करायचे हे आपण त्याला शिकवू, कसे काम करायचे हे त्याला ठाऊक आहे आणि माझ्या मते ते तितके पुरेसे आहे."
दरवाज्याकडे पोचल्यावर त्याने मागे वळून आपल्या साथीदारांना म्हटले,
"आणि हो, त्याचा मित्र विचारे, मेहनती आहे, मन मोडून काम करेन, पण मनुष्याच्या अस्तित्वाबद्दलची त्यांची जाणीव थोडी कमी आहे. फ्लोरवर काम करेल तर येईलच हळू हळू."
लेखक: संदीप डांगे